बर्याच वेळा काही कारणाने आपल्या प्रतिमा चित्रात काही तरी खटकणारे असते म्हणून अशी प्रतिमा आपण अडगळीत टाकतो. अशी प्रतिमा व खटकणारी अयोग्य जागा "फोटोशॉप" ह्या प्रतिमा संपादकाने स्चच्छ करणे शक्य असते ते कसे ह्याचा हा नमुना.

माझे स्नेही श्री नरेन्द्र गोळे ह्यांच्या हे प्रतिमा चित्र आहे (त्यांच्या परवानगीने). चष्म्यात उजेड आल्याने त्यांना हे आवडले नाही. त्यांनी हे चित्र मला स्काईपच्या माध्यमातून पाठवले होते. मी त्यांना तास भर वेळ मागीतला व "फोटोशॉप ७" च्या साह्याने संपादनाला सुरुवात केली.
