१९६७ ला रेडिओचे दुरूस्तीचे प्रशिक्षण पूर्ण करून नुकताच गावी परतलो होतो. त्या काळात माझ्या माहिती नुसार एवढा छोटा स्टीरीओ रेडीओ अजुन बाजारात आलेला नव्हता. लॅमिंग्टन रस्त्याला असलेल्या दुकानातून सुटे भाग वीकत घेतले होते. त्यात ५ बॅन्डच्या एका डायलच्या आकाराचा ८ X ५ X 24 इंचाचा हा रेडीओ तयार केला होता. हा फोटो माझ्या जवळ नव्हता, त्या काळात फोटो काढणे मला परवडणारे नव्हते. पण कालच फोटोशॉप वापरून गुगलचा शोध घेउन ह्या दोन प्रतिमा तयार केल्या आहेत.
कॅबीनेटच्या आत सगळे भाग आडवे ठेवलेले होते.
ह्या रेडीओची चॅसी जाड पत्र्याची तयार केली होती. आतली उष्णता बाहेर जावी म्हणून बाहेरील कव्हर जाळीदार अलुमिनियमचे वापरले होते.


No comments:
Post a Comment